Views


राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश युवक  सरचिटणीस पदी तारेक सलीम मिर्झा यांची निवड 

कळंब:-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे युवा नेते तारेक सलीम मिर्झा यांची प्रदेश युवक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवक  कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी नियुक्ती पत्र दिले. 
            गेल्या अनेक वर्षांपासून मिर्झा कुटुंबीय राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनिष्ठ राहिले आहेत. तारेक  मिर्झा यांचे वडील स्वर्गीय सलीम मिर्झा हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अखेरपर्यंत नेते होते. सलग 35 वर्षे ते कळंब नगरपालिकेचे नगरसेवक होते.  राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष पदापासून त्यांनी सुरूवात केली. नंतर कळंब नगरपालिकेचे स्वीस्कृत नगरसेवक ,उस्मानाबाद अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष या पदावर त्यांनी काम पाहिले आहे. तारेक सलीम मिर्झा हे उस्मानाबाद जिल्ह्यातील मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यापैकी एक आहेत. तसेच सर्वच पक्षातील नेत्या सोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासूनपक्षासोबत एकनिष्ठ असल्याची पोचपावती म्हणून तारेक मिर्झा यांना पक्षाने प्रदेश युवक सरचिटणीस पदाची धुरा दिली आहे
 
Top