Views


विविध पूरस्काराने सन्मानित  प्रा.राजा जगताप यांचा सत्कार संपन्न

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील मराठी विभागातील प्रा.राजा जगताप यांनी लाॅकडाऊनच्या काळात कोरोना संबंधित विविध विषयावर  लेखण केले होते व ते लेखण करण्यासाठी त्यांनी त्या त्या संबंधित ठिकाणी जावून कोरोनाला न घाबरता लेखण केले होते व गरजूंना मदत ही केली होती.त्यांच्या लेखणाची दखल घेवून प्रा.राजा जगताप यांना "कोरोना योध्दा" म्हणून महाराषट्र राज्यातील विविध पञकार संघ,साप्ताहिके, प्रेस असोशिएशन,नामांकित फौंडेशन ,सामाजिक संस्था,यांचेबरोबरच दिल्ली,उत्तरप्रदेश,बिहार,छत्तीसगढ या राज्यातील फौंडेशन यांनी  सन्मानपञ,पुरस्कार देवून गौरव केला आहे.तसेच त्यांना नुकताच दादासाहेब फाळके फिल्म अवार्ड कडूनही "कोरोना योध्दा"हा पुरस्कार प्राप्त झाला होता.प्रा.राजा जगताप यांना ४५पुरस्कार मिळाल्याबद्दल जाणीव अस्मितेची साहित्य परिषद मराठवाडा, शाखा उस्मानाबाद जिल्हा शाखेकडून नुकताच प्रा.राजा जगताप यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी ॲड.भारती रोकडे,परमेश्वर नागटिळक,सुदेश माळाळे यांनी सत्कार केला.

 
Top