Views


उमरगा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे -- भाजप तालुकाध्यक्ष कैलास शिंदे

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
उमरगा तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजप प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर, आ.राणाजगजितसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजप तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांनी तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून दुधाचे भाव 16 ते 18 रुपये पर्यंत घसरले आहेत. महाराष्ट्रातील कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नसल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो दर मिळत नाही. तरी शासनाने लोहारा तालुक्यातील दूध शेतकऱ्यांच्या दुधाला सरसगट 10 रुपये अनुदान द्यावे, प्रति लिटर दुधाला 30  रुपये खरेदी भाव द्यावे, दूध भुकटीकरिता प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे, यंदाच्या खरीप हंगामात विविध कंपन्याचे सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून अशा शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, दोन लाखापेक्षा अधिक पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी न झाल्यामुळे व त्यांना चालू वर्षातील नवीन पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे, त्यामुळे दोन लाखापेक्षा अधिक पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन तात्काळ नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, लॉक डॉऊन काळात घरगुती व शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करावे, या मागण्यावर राज्य शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा दिनांक 1 ऑगस्ट 2020 रोजी आंदोलन छेडण्यात येईल व उमरगा शहरात कोरोनाचे रुग्ण मोठया प्रमाणात वाढत आहेत तात्काळ 15 दिवसाची टाळेबंदी करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, माजी तालुकाध्यक्ष माधव पवार,
सरचिटणीस सिद्धेश्वर माने, आर.पी.आय तालुकाध्यक्ष सुभाष सोनकांबळे, रासपचे भागवत पाटील, मनोज सूर्यवंशी, महेश कलशेट्टी, उपस्थित होते.
 
Top