Views


लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा, हिप्परगा सयद, कास्ती बु., कास्ती खु., व लोहारा मंडळात असलेल्या पण तुळजापूर तालुक्यातील शिवकरवाडी ही गावे पीकविमा कंपनीच्या पोर्टलवर दिसत नसल्याच्या व इतर तांत्रिक अडचणी दूर केल्या आहेत तरी शेतकऱ्यांनी पिक विमा भरून घ्यावा -- आ.ज्ञानराज चौगुले


लोहारा:-(इकबाल मुल्ला)
सध्या खरीप पीकविमा भरण्याची शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. यासाठी शासनाने  सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी 31 जुलै व पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दि. 27 जुलै अंतिम तारीख दिलेली आहे. परंतु लोहारा तालुक्यातील हिप्परगा रवा, हिप्परगा सयद, कास्ती बु., कास्ती खु., व लोहारा मंडळात असलेल्या पण तुळजापूर तालुक्यातील शिवकरवाडी ही गावे पीकविमा कंपनीच्या पोर्टलवर दिसत नसल्याच्या व इतर तांत्रिक अडचणी असल्याबाबत असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या. या अनुषंगाने मी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ - मुंडे, व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उस्मानाबाद यांच्याशी सम्पर्क साधला असता सदरबाबत विमा कंपनीच्या N.I.C. कार्यालय, दिल्ली येथूनच पुढील कारवाई शक्य असल्याचे निदर्शनास आले. या दोन्ही कार्यालयाकडून याबाबत दिल्ली येथील कार्यालयात तक्रारही नोंदवण्यात आली. व  याबाबत उस्मानाबाद जिल्ह्याचे खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही दिल्ली येथील कार्यालयास आवश्यक त्या सूचना केल्या, याची फलप्राप्ती म्हणून सध्या हिप्परगा रवा, हिप्परगा सयद, शिवकरवाडी, या तीन गावांबाबतची तंत्रिक अडचण दूर झाली आहे. कास्ती बु. व कास्ती खु. ही दोन गावे सदर पोर्टलवर एकाच नावाने दिसून येत असली तरी ही दोन्ही गावे एकाच मंडळातील असल्याने व पीकविमा हा सध्याच्या निकषानुसार मंडळनिहाय मंजूर होत असल्याने या दोन्ही गावातील शेतकऱ्यांनी पिकविमा भरल्यास भविष्यात त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. सध्या लोहारा तालुक्यातील पर्जन्यमान अद्यापपर्यंत अत्यल्प प्रमाणात आहे. भविष्यात कोणतेही संकट उदभवल्यास नुकसानभरपाई मिळणेकरीता लोहारा तालुक्यातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी (उपरोक्त 5 गावांसहे) दिलेल्या मुदतीत पीकविमा भरून घ्यावा, असे आव्हान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केले आहे.
 
Top