Viewsशिवसेना नेते शंकरराव बोरकर यांनी सामाजिक भावना जपत आपले  शॅापिंग माॅल कोरोना क्वॅारनटाईल सेटंरसाठी दिले आहे

लोहारा:- (इकबाल मुल्ला)
मुंबईत आणि परिसरांत कोरोनाचा  प्रभाव वाढू नये म्हणुन जागोजागी कोरोना क्वॅारनटाईल सेटंर उभारले जात आहे. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक भावना जपत धनश्री डेव्हलपचे प्रशिद्ध उद्योजक शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांनी स्वत:चे एक लाख फुटाचे मुंबई कल्याण येथील शॅापिंग माॅल हा महाराष्ट्र सरकारला करोना सेटंर साठी उपलब्ध करून दिला आहे. दि.11 जुलै रोजी मंत्री अदित्य ठाकरे, मंत्री एकनाथशिंदे यांनी या माॅलला साईट व्हिजीट दिली. यावेळी शंकरराव बोरकर म्हणाले की, मला अभिमान व माझे भाग्य कि, मला जनतेच्या सेवा करण्याचा खारीचा वाटा मिळाला आहे. यापुढेही आपण जनतेच्या सदैव सेवेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन पुढे येणार असल्याचे शिवसेना नेते शंकरराव बोरकर यांनी सांगीतले.


 
Top