Views


कोरोना चाचणी केंद्रासाठी विठ्ठलसाईकडून चार लाखाची मदत

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी कोरोना चाचणी केंद्रासाठी मुरूम येथील विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बसवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कार्यकारी संचालक एम.बी.अथणी यांनी 4 लाख रुपये निधीचा धनादेश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंढे यांना दि.14 जुलै रोजी यांच्याकडे सुपूर्द केला. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यत घेण्यात आलेले स्वॅब सुरुवातीच्या काळात सोलापूर येथे पाठवण्यात येत होते. त्यानंतर जिल्ह्यातील स्वॅब नमुने घेऊन ते लातूर येथे तपासणीकरिता पाठविले जात आहेत. मात्र त्यांचे अहवाल येण्यास बराच विलंब लागत असल्याने एकादा कोरोना बाधित रुग्ण दगावण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायमस्वरूपी कोरोना चाचणी केंद्र असणे गरजेचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात तज्ञ मनुष्यबळ असून असे कोरोना चाचणी केंद्र सुरू करण्याकरिता विठ्ठलसाई कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक एम.बी.अथणी यांनी 4 लाख रूपये निधीचा धनादेश जिल्हाधिकारी दिपा मुधोळ - मुंढे यांच्याकडे सुपूर्द केला.

 
Top