Views


कोरोना पार्श्वभुमीवर तालुक्यातील वडगाव (सि) येथील यात्रा स्थगित, शासनाच्या सूचनेप्रमाणे मंदिर संस्थानचा निर्णय 
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाच्या वतीने राज्यातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. याच पार्श्वभुमीवर तालुक्यातील वडगाव (सि.) येथील सिध्देश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरणाऱया यात्रा शासनाच्या सूचनेप्रमाणे स्थगित करण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वडगाव (सि.) येथे डोंगरामध्ये सिध्देश्वराचे प्राचीन व जागृत देवस्थान आहे. श्रावन महिन्यात तर मंदिर व परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला असल्याने येथे भाविकांची मोठी गर्दी असते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे मोठी यात्रा भरत असल्याने भाविकांचा जनसागर लोटलेला असतो. परंतू सध्या देशासह राज्यात तसेच जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने गर्दी होवू नये म्हणून राज्यातील धार्मिक स्थळे बंद तर व यात्रा स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शासनाच्या सूचनेप्रमाणे वडगाव (सि) येथील सिध्देश्वराची श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भरणाऱया यात्रा मंदिर संस्थनच्या वतीने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या काळात केवळ मंदिर संस्थानच्या वतीने धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. इतर कोणत्याही भाविकास मंदिरात प्रवेश देण्यात येणार नाही. तेव्हा परिसरातील भाविक - भक्तांनी याची दखल घ्यावी असे आवाहन श्री. सिध्देश्वर मंदिर संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
 
Top