Views




सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करून  ग्रुपच्यावतीने अण्णा - अक्कांचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा

उस्मानाबाद:- (प्रतिनिधी)

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचे पालन करून उदगीर येथील जीव्हाळा ग्रुपच्या वतीने दिनांक 3 जुलै रोजी रोजी वैजनाथ शंकरप्पा पंचगल्ले यांच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त वृक्षारोपण करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वैजनाथराव हे गेल्या दहा वर्षापासून जिव्हाळा ग्रुपचे एक क्रियाशील व सक्रिय सभासद असून त्यांनी विविध सार्वजनिक कामांमध्ये स्वतःला झोकून देवून जबाबदारीने काम पार पाडले आहे. त्यांनी शिक्षक म्हणून काम करताना विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी एक वेगळी  पध्दती अवलंबली होती. त्यामुळेच ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाले होते. ते एक उत्कृष्ट चित्रकार, फरडे वक्ते, नाटककार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख या परिसरात आहे. मुळचे अतनूर तालुका जळकोट येथील रहिवाशी असून त्यांचे शिक्षण डीएड तुळजापूर येथे पूर्ण झाले होते. सतरा वर्षांपूर्वी ते शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर दहा वर्षापासून जिव्हाळा ग्रुपच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून सतत कार्यतत्पर राहणे आणि गरजूंना मदत करणे हा सेवाभाव त्यांचा राहिल्यामुळेच या परिसरातील सर्व लोक त्यांना 'अण्णा ' या नावाने तर त्यांच्या पत्नी कमल यांना ' अक्का ' या नावाने ओळखले जाते. त्यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारत मल्टीपरपज एज्युकेशन सोसायटी,नळगीरचे तथा जीव्हाळा ग्रुपचे अध्यक्ष देविदास नादरगे, उपाध्यक्ष विश्वनाथ माळेवाडीकर, राष्ट्रपती पोरितोषिक मानकरी तथा संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ मुडपे, कोषाध्यक्ष चंद्रकांत रोडगे, संस्था सचिव रमाकांत बनशेळकीकर, सचिव विवेक होळसंबरे, पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य तथा जिव्हाळा ग्रुपचे समन्वयक डॉ.अनिल भिकाणे, सहसचिव पांडुरंग बोडके आदींनी त्यांचा सपत्नीक सत्कार करून पुढाकार घेऊन हा सोहळा यशस्वी केला. यावेळी अल्प उपहाराचा कार्यक्रमही पार पडला.
 
Top