Views


विधानपरिषदेचे सदस्य तथा मुख्य प्रतोद आ.सुजितसिंह ठाकूर यांची भाजपाच्या प्रदेश सरचिटणीस पदी फेरनिवड
  
उस्मानाबाद:-(प्रतिनिधी )

 आमदार सुजितसिंह ठाकूर यांची भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेशाचे सरचिटणीस पदी फेर निवड केली आहे. दि.३ रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजपाची प्रदेश कार्यकारीणी जाहीर केली त्यात आ.ठाकूर यांची निवड झाली. आ.ठाकूर यांची सुरवात दै. तरुण भारत या वृत्तपञाचे पञकार म्हणून 1986 साली झाली. आपल्या पञकारीते मध्ये त्यांनी दैनिकात मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात छाप पाडली यातुनच धाराशिव  जिल्ह्यातील एक निष्ठावंत चेहरा महाराष्ट्र भाजपला दिसला या विभागात काम करत असताना वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला. त्यांची त्यावेळी निर्भीड पञकार म्हणून ख्याती निर्माण झाली.  पञकारीता करत असताना जनसामान्यांशी असलेला जनसंपर्क वाढत गेला. त्यांनी 1991 साली प्रथमता भारतीय जनता पार्टीकडून परंडा नगरपालिकेची निवडणूक लढवली व भरपूर मताधिक्याने निवडूणही आले व या निवडणूकीने त्यांनी राजकीय क्षेञात प्रवेश केला. सतत १० वर्ष नगरसेवक असतानाची गुणवत्ता पाहून कामाचा अनुभव असल्याने आ.सुजितसिंह ठाकूर हे नगराध्यक्षपदी विराजमान झाले. आ.ठाकूर हे परंडा न.प.चे तीन वेळेस नगराध्यक्ष राहीले. परंडा न.प.मध्ये नगराध्यक्ष पदावर काम करत असताना त्यांनी आपल्या चारीञ्यावर कसलाही डाग लागू दिला नव्हता. मा.ठाकूरसाहेबांचे काम पाहून १९९३ मध्ये भा.ज.यु.मो च्या जिल्हाध्यक्ष पदी काम करण्याची संधी मिळाली. भा.ज.यु.मो मधील काम पाहून १९९६ साली  पक्षश्रेष्ठींनी पक्षाच्या जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली. या विविध पदावर काम करण्याची हुन्नर होती. ती हुन्नर पाहून पक्षक्षेष्ठीही भारावून गेले. साहेबांना एकापेक्षा एक मोठ्या पदावर काम करण्याची संधी मिळत असतानाच २ वेळा म्हणजेच ६ वर्ष धाराशिव चे जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्यांची संधी मिळाली. या काळात पक्षाचे जिल्ह्यातील संघटन आणखी मजबूत करुन पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील पक्षसंघटनेतील कामाचा धडाका पाहून प्रदेशाने मा.ठाकूर साहेबांवर भा.ज.यु.मो. च्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदही साहेबांकडे चालून आले . यानंतर महाराष्ट्र भर दौरे काढून युवा मोर्चा कडे तरुणांना आकर्षित करुन संघटना मजबूत करण्याचे प्रयत्न केले. या सर्व कामाची दखल घेत भा.ज.पा. प्रदेश कार्यकारीणीने प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी दिली. ती आजपर्यंत साहेब खंबीरपणाने,चारीञ्यावर शिंतोडे उडु न देता ,उत्कृष्ट काम करुन प्रदेश सरचिटणीस या नावाला शोभेल अशी कामगिरी करताना दिसून येत आहे. या पदावर काम करत असताना संपूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास.राज्यातील प्रश्नांची जाणीव करुन घेतली व त्यादृष्टीने काम केले. अनेक वेळा पक्ष अडचणीत असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली .पक्षांर्तगत व विविध पक्षाशी सामंजस्य करण्यासाठी पक्षाने मोठ्या विश्वासाने जबाबदारी टाकली.
          त्यांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या म्हणजेच मा.गोपीनाथरावजी मुंडेसाहेब यांची संघर्षयाञा .विविध राज्यातील प्रचाराची जबाबदारी ,
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या महाराष्ट्रातील सभांचे यशस्वी नियोजन ,मागील काळातील सदस्यता नोंदणी प्रमुख,मा.ना.पंकजाताई मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष याञेचे यशस्वी नियोजन ,मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या महाजनादेश याञेचे प्रमुख म्हणून यशस्वी नियोजन,मोदी सरकारचे वर्षपुर्ती अभियान महाराष्ट्राचे संयोजक, कै.गोपीनाथरावजी मुंडेसाहेब,श्री.नितीन गडकरी साहेब,श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार,श्री.देवेंद्रजी फडणवीस,
श्री.रावसाहेबदादा पाटील दानवे,श्री .चंद्रकांतदादा पाटील, यांच्या प्रदेशाध्यक्ष  कार्यकाळात ठाकूर साहेबांनी प्रदेशात यशस्वीपणे काम केल्याने दांडगा अनुभव आहे.
     १९९५ पासुनच साहेबांना विधानपरिषदेवर जाण्याची संधी आली तसेच उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातुन निवडणुक लढायची संधी आली परंतु मिञ पक्षाकडे जागा असल्यामुळे त्यांनी माझ्यामुळे कुणाची नाराजी नको म्हणून शांत रहाणे पसंत केले.पक्षासाठी इतर नेत्यांना नाराज न करता आपल्याला चालून आलेली संधी ही इतर नेत्यांना त्यांनी दिली,नुकतेच विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेता पद उदाहरण म्हणून सांगता येईल, त्यावरून त्यांचे मोठेपण दिसून येते.त्यानंतर २०१६ साली विधानपरिषदेवर आमदारांचे प्रतिनिधी म्हणून भाजपाकडून निवड करण्यात आली.मराठवाड्यातील प्रश्न या माध्यमातून सुटण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न सुरु झाला. 2019 साली विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेतेपद शेवटच्या क्षणात दुसऱ्याकडे जाणे तरीही न डगमगता सतत पक्षसंघटनेतील कामात अग्रेसर असणारे आ.ठाकूर आज मराठवाड्याचा चेहरा म्हणून महाराष्ट्रात आपल्या नेतृत्वाचा ठसा दाखवतेत.
    अशा ह्या कर्तुत्व,नेतृत्व,आणि वक्तृत्वाने सजलेल्या निष्कलंक अशा नेत्याला प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदाची  संधी दिल्याबध्दल अभिनंदन व शुभेच्छा.
 
Top