मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व खासदार.ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेना धाराशिव व वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
वाशी येथे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब व खा.ओमराजे निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना धाराशिव व वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय वाशी येथे नवजात बाळाला ड्रेस व आईला साडी तसेच नगरपंचायत सफाईकामगार यांना साडी व मास्क भेट देण्यात आली.
तसेच धाराशिव शिवसेना तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी यांचा प्रशांत (बाबा) चेडे यांच्या वतीने तसेच वाशी नगरपंचायत व तालुका शिवसेना यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते प्रशांत (बाबा) चेडे धाराशिवचे तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी,वाशी नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष नितीन चेडे ,नगराध्यक्ष श्री नागनाथ नाईकवाडी , उपनगराध्यक्ष श्री. प्रसाद जोशी , शिवसेना वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गापाट , शिवहार स्वामी , सतीश शेरकर ,मकरंद शिंगणापूरे, लायक तांबोळी , शिवाजी कवडे, बाळासाहेब मोळवणे ,आदी उपस्थित होते.