Views
उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याची मोठी कारवाई ; ८०  वाहनावर लावला दंड ! 

 उस्मानाबाद :-(प्रतिनिधी)
   उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव यांच्या पथकाने आज उस्मानाबाद शहरांमध्ये धाडसी कारवाई करून  ८० जणांविरुद्ध कारवाई केली. कोरोना  संसर्ग रोखण्यासाठी  उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणपत जाधव यांच्या पथकाने रस्त्यावरून दुचाकी डबलसीट बसणे, नाक तोंड उघडे ठेवणे, मास्क न लावणे . रसत्यावर थुंकणे ,हे क्रत्य करणार्या लोकानां दंड करण्यात आला. कोरोना  रोखण्यासाठी उस्मानाबाद शहरांमध्ये आज सकाळी ११  वाजण्याच्या सुमारास तुळजापूर रोडवर उस्मानाबाद शहरातील आयुर्वेदिक दवाखान्याच्या   समोर ही कारवाई करण्यात आली. यावेळी उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी व महिला कर्मचारी  यांनी ही कारवाई केली.  शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव हे रस्त्यावर उभारून शहरात मोटारसाकलवर  विनाकारण फिरणारे व कायद्याचे उल्लंघन करणार्या  वाहन धारकांना  रस्त्यावर नाका बंदी करुन  त्यांची विचारपूस करून योग्य कारण सांगितले तर त्यांना सोडण्यात आले. व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यावर  दंड करून त्यांना सोडण्यात आले.तसेच रुग्ण व महिलांना   घेऊन जाणार्या वाहनांना व मोटारसायलींना विचारपूस  करुन सोडण्यात आले. उस्मानाबाद शहरांमध्ये विनाकारण फिरणार्यांचे  या कारवाईमुळे चांगलेच धाबे दणाणले आहेत.  शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत जाधव यांचा टवाळखोरांनी चांगलाच धसका घेतला आहे. यापूर्वीही गणपत जाधव यांनी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर उस्मानाबाद शहरात  अंत्यसंस्कार करण्यासाठी कायदा व्यवस्था कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. तोही त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळला होता त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची सध्या चांगलीच जिल्ह्यात चर्चा सुरु आहे आज उस्मानाबाद शहरात 
आयुर्वेदिक दवाखान्या समोर  समोर  नाकाबंदी करण्यात आली होती. यात खालील प्रमाणे दंड वसुल करण्यात आला.
नाकाबंदी पोलीस ठाणे उस्मानाबाद शहर
६/७/२०२० ११०० ते 1300
आयुर्वेदिक काँलेज, उस्मानाबाद
४० केसेस ८००० रूपये
४० केसेस ८००० अनपेड
एकुण ८० केसेस  १६०००रूपये दंड सदरची हि उस्मानाबाद पोलीस अधीक्षक उप विभागीय पोलीस अधीकारी मोतीचंद राठोड , प्रभारी अधीकारी एस.के.मोदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 
Top