Views


कळंब शहरातील कोरोना काळातील वीज बिल माफ करा- कळंब मनसेचे तहसीलदारांना निवेदन

कळंब:-(प्रतिनिधी)
कळंब-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचे मार्च २०२० पासून आजतागायतचे वीज बिल माफ करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदनाद्वारे कळंब तहसीलदार यांचेकडे केली आहे. कोरोना महामारी रोगामुळे शहरातील नागरिकांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले असून वीज बिल माफ झाल्यास नागरिकांना दिलासा मिळेल असे सदरील निवेदनात म्हंटले आहे. व वीज बिल माफ न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदनावर मनसे कळंब शहराध्यक्ष अमोल राऊत, तालुकाध्यक्ष सागर बारकुल,जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बंदर,गोपाळ घोगरे, संजय कोळी,विलास बंडगर, कृष्णा गंभीरे, गणेश घोगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 
Top