नोंदणी शुल्क विभाग विमा कवच लागू करण्याची मागणी अधिकारी कर्मचाऱ्यांचे मंगळवार (दि.२८) रोजी एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जीवन सुरक्षा विमा कवच लागू करावे यासह अन्य मागण्यासाठी राज्यातील नोंदणी व मुद्रांक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.28)रोजी एक दिवसाचे लेखणीबंद आंदोलन पुकारले आहे. यात जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत या संदर्भात संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार म्हणाले संघटनेच्या एकूण 11मागण्या आहेत यामध्ये सध्या कोरोनाच्या काळात मुद्रांक विभागातील कर्मचारी 100 टक्के उपस्थिती मध्ये काम करत आहेत. मात्र विभागातील कर्मचाऱ्यांनी मागणी करूनही जीवन सुरक्षा विमा कवच लागू केलेले नाही. कार्यालयामध्ये कोणत्याही सोयीसुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत तसेच मागण्या मान्य न झाल्यास 4 ऑगस्टपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचे पवार यांनी म्हणाले,
या मागण्या मान्य न झाल्यास संघटनेकडून दिनांक 28/7/2020 रोजी एक दिवसाचे लेखणी बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
1)सर्व संवर्गातील रखडलेल्या पदोन्नत्या तात्काळ करण्यात याव्यात.
2)मुंबई शहरातील मुद्रांक जिल्हाधिकारी यांचे पदे विभागातून पदोन्नतीने भरण्यात यावे.
3)रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी
4)Covid-19 मुळे मयत झालेले अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबियांना तात्काळ 50 लाखाची मदत करण्यात यावी व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यात यावी.
5)विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना 50 लाखाचे विमा कवर देण्यात यावे.
6)PLA ची रक्कम विभागातील कार्यालयाच्या व जनतेच्या सुविधेसाठी वापरण्यात येईल.
7)तुकडेबंदी व रेरा कायद्या नवीन झालेल्या कार्यवाहीचा मागे घेण्यात यावे.
8)सह दुय्यम निबंधक वर्ग दोन व दुय्यम निबंधक श्रेणी-1 संवर्गात एकत्रीकरण करण्यात यावे.
8)हार्डवेअर साहित्य उच्च दर्जाचे पुरविण्यात यावी.
9)Incom Tax विवरण पत्र पोलीस विभाग व इतर विभागाकडून मागणी केल्या जाणाऱ्या माहिती केंद्रीय सर्वर संबंधितांना पुरविण्यात यावे.
10)I sarita ,E Mutation,Grass व आधार सर्वच्या अडचणी दूर करण्यात येई
नोंदणी अधिकारी यांचे विरुद्ध विनाकारण दाखल होणारे गुन्हे मागे घेण्यात यावे.
11)नवीन आकृतीबंध अनुसार शिपाई पदे निरसित न करता कायम ठेवण्यात यावे.
12)पद्मा मध्ये बदल करण्यात यावा
निनावी तक्रारी बाबत कार्यवाही करण्यात येऊ नये.
तरीही मागण्या मान्य न झाल्यास दिनांक 04/08/2020 पासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन संघटनेकडून करण्यात येणार आहे.