Views


कळंबच्या युवकांचे जखमी बैलावर औषधोपचार

कळंब:-(प्रतिनिधी)
शुक्रवार ( दि. 24) रोजी सकाळी कळंब शहरातील गजबजलेला परिसर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अज्ञात वाहन चालकाने बैलाच्या पायावरुन गाडी घातल्याने बैल जखमी झालं होतं.त्याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन प्रचंड रक्तस्त्राव होत होता बिचारा मुका जिव वेदनेने बेचैन झाला होता. पण काही लोक फक्त बघून सोकाॅल्ड सुशिक्षीत फक्त पाहुन पुढे जात होते पण या मुक्या जनावराला उपचाराची गरज आहे हे कोणाच्याही लक्षात आलं नाही सर्वांना जरी हे माहिती असले तरी कुणीही या मुक्या जीवाला वाचवण्यासाठी पुढे आले नाही.
ही गोष्ट लक्षात आल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष अतुल गायकवाड,अक्षय मुळीक व पशु वैद्यकीय कर्मचार्यांच्या सहाय्याने या खोंडावर उपचार करुन त्याला  सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले..तर या युवकांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे तर मुक्या जीवास मदत न करणाऱ्या पाशानहृदयी लोकांवर नाराजी व्यक्त होत आहे..

 
Top