नागपंचमी निमित्त सामाजिक भावना जपत कल्याण ढगे परिवाराच्यावतीने लोहारा शहरात मास्क वाटप
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
नागपंचमी सणाचे औचित्य साधून परंपरागत नागोबाचे पुजारी म्हणून परिचित असलेले कल्याण ढगे परिवाराकडून लोहारा शहरातील बसवेश्वर मंदिराच्या परिसरातील नागोबाच्या मंदिराची आज नागदेवताचे पूजा केली जाते. यानिमित्त सामाजिक भावना जपत पूजेसाठी आलेल्या महिलांना कल्याण ढगे व सौ मोनाली ढगे यांच्याकडून सोशल डिस्टन्स चे काटेकोरपणे पालन करून मास्क वाटप करण्यात आले. यावेळी अँड. दादासाहेब पाटील, प्रमोद पोतदार, नागनाथ लोहार, समीर शेख, राजेंद्र ढगे, विजय महानूर, आदी यावेळी उपस्थित होते.