Views


विद्यार्थीनीने पेढ्याऐवजी सानिटायझरचे केले वाटप 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
 वसंतदादा पाटील हायस्कूल लोहारा येथील विद्यार्थीनी कु.नेहा उद्धवराव सोमवंशी हि एस.एस.सी. परीक्षेत 94.20 % गुण मिळवून द्वितीय आली. यावेळी नेहाने जागतिक कोरोना महामारीचे संकट लक्षात घेवुन वसंतदादा पाटील हायस्कूल व नेताजी सुभाषचंद्र बोस क.महाविद्यालय येथील गुरूजनांना पेढे वाटण्याऐवजी सनिटायझर स्प्रेच्या 50 बॉटल वाटप केल्या.ज्ञशिक्षणासोबतच नैतिक मुल्ये, सामाजिक बांधिलकी जपणारे विद्यार्थी शाळेतुन घडत आहेत. तिच्या या वेगळ्या उपक्रमाबद्दल संस्थेचे सचिव  प्रा.शेषेराव जावळे पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती यु.व्ही.पाटील, सर्व शिक्षक प्राध्यापक यांनी या विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन केले.यावेळी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
 
Top