Views


प्रा.राजा जगताप यांना मानवाधिकार संरक्षण समितीचा पुरस्कार 

उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विभागाचे प्रा.राजा जगताप यांना, त्यांनी ,सध्याच्या कोरोना परिस्थितीत लाॅकडाऊनमध्ये, लेखक म्हणून केलेले सातत्याने कोरोना संबंधी विविध विषयावरील लेखण व गरजूंना केलेली मदत याची दखल घेवून मानवाधिकार संरक्षण समीती, नवी दील्ली, यांच्या   महाराष्ट्र राज्य शाखेने "कोविड योध्दा"हा पुरस्कार देवून नूकताच गौरव केला आहे.मानवाधिकार संरक्षण समिती राज्यध्याक्ष शिवाजीराव पाटील, जी.एम.भगत (प.म.राज्य जन संपर्क अधिकारी), प्रविण गायकवाड राज्य उपाध्यक्ष यांनी राजा जगताप यांचे सन्मानपञ देवून अभिनंदन केले आहे.या अगोदर त्यांना महाराष्ट्र पञकार संघ,व महराष्ट्र राज्य व दिल्ली येथील विविध फाउंडेशन आणि सामाजिक संस्थांनी "कोरोना योध्दा"पुरस्कार देवून राजा जगताप यांचा सन्मान केला आहे.त्यांना सलगपणे २५कोरोना योध्दा म्हणून पुरस्कार प्राप्त झाले आहेत 
राजा जगताप यांना विविध पुरस्कार मिळाल्याबद्दल दै.भासकरचे उस्मानाबाद जिल्हा ब्युरो चिफ व ज्येष्ठ पञकार मा.राजाभाऊ वैद्द यांनी नुकताच त्यांचा सत्कार केला आहे यावेळी पञकार गोविंद पाटील,पञकार सुधीर पवार,प्रवर्तन जगताप उपस्थित होते.

 
Top