Views


कळंब दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्या कळंब तालुका भाजपच्या वतीने मागणी....

कळंब:-(प्रतिनिधी)
 सध्या कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. सध्या दुधाचे दर 16 ते 18 रुपये घटले आहेत.सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या कोरोना संकटामुळे दूध संकलन होत नाही.त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
   त्यामुळे या शेतकऱ्यांना योग्य तो दर मिळत नाही राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे केवळ ठराविक दूध संघ पुरती मर्यादित असल्यामुळे सध्या उत्पादित होत असणाऱ्या दुधाचे करायचे काय असा बिकट प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.तरी शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 10 रूपये अनुदान थेट बँकेत जमा करण्यात यावी.दूध पावडर च्या निर्यातीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे गाईच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव द्यावा. व सरकार ने वेळीच दखल घेतली नाही. तर  01 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल अशी मागणी कळंब तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली.
    यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, संदीप बाविकर ,मिनाज शेख ,सत्यपाल बनसोडे, माणिक बोंधर,  रामहरी शिंदे, संजय जाधव, अरुण चौधरी, बंडू बनसोडे ,अविनाश खापे, प्रशांत लोमटे ,इम्रान मुल्ला आदी उपस्थित होते.
 
Top