Views


खासगी फायनान्सचा मनमानी कारभार : शिवसेनेच्या वतीने निवेदन.... 

उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)

जिल्ह्यातील काही खाजगी फायनान्स चे कर्मचारी कोरोना संक्रमण काळामध्ये पूर्व तपासणी व कोणाचीही पूर्वपरवानगी न घेता अवेळी बचत गटाच्या माध्यमातून वसुली करण्यासाठी डायरेक्ट घरी जात आहेत. यावेळी कोरणा संक्रमणाचा धोकाही वाढत आहे. व महिला सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत आहे.
  तरी आर .बी .आय बँकेने कर्ज वसुली न करावी  सदरील खाजगी फायनान्स सक्तीची वसुली करत आहे. सध्या कोरोना हा संक्रमणाचा काळ असल्याने ग्रामीण भागातील लोकांच्या हाताला काम नसतानाही सदरचे खाजगी फायनान्स वाले त्यांच्या कर्मचाऱ्या मार्फत सक्तीची वसुली करून ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक मानसिक व आर्थिक त्रास देत आहेत. आपण आपल्या स्तरावरून फायनान्स कंपनीच्या सक्तीच्या वसुली विरोधात योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा वाशी तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना स्टाईलने सदरील फायनान्स कंपनी ची वसुली थांबविण्यात येईल व होणाऱ्या पुढील घटनेस सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी. अशा प्रकारचे लेखी निवेदन नायब तहसीलदार स्नेहलता पाटील यांना देण्यात आले.
   यावेळी सुरज बाळासाहेब सुकाळे ,अनिकेत  शिंदे ,अमोल जानराव ,किरण सावंत ,अमोल सुकाळे ,विजय जानराव ,राहुल गायकवाड ,प्रवीण पालखे ,सिद्धोधान सुकाळे ,बाळू गायकवाड ,ऋतिक आरकडे व समस्त शिवसैनिक  वाशी. यांच्या निवेदनावर सह्या आहेत
 
Top