Views



बकरी ईद रमजान सणाप्रमाणेच साध्या पध्दतीने साजरी करावी -- मुस्लिम जमात कमिटीचे मुस्लिम बांधवांना आवाहन 

लोहारा:-(इकबाल मुल्ला)
दि.1 ऑगस्ट रोजी मुस्लिम धर्मातील बकरीईद सण साजरा होणार आहे. त्यासाठी उमरगा शहरात मुस्लिम जमात कमिटीच्या वतीने दि.24 जुलै रोजी मरकज मस्जिद येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मुस्लिम बांधवांनी बकरी ईद हा सण साध्या पध्दतीने साजरा करण्याचे ठरले. ईद दिवशी कोठेही गर्दी करू नये,   प्रत्येकांनी शासनाने ठरवुन दिलेल्या नियमाचे पालन करावे आदी विषयावर चर्चा करण्यात आली. प्रतीवर्षी सर्व मुस्लिम बांधव गुंजोटी मोड येथे असणाऱ्या ईदगाह येथे एकत्रीत येऊन ईदगाह मैदानावर  " ईद उल-अज़हा" नमाज अदा करीत असतात. परंतु या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव घरीच नमाज अदा करावे असे, आवाहन मुस्लिम जमात कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. ईद उल-अज़हा ही 'बलिदानाची ईद' आहे. मुस्लिम मान्यतांनुसार, हजरत इब्राहिम आपले पुत्र हजरत इस्माईल यांना याच दिवशी अल्लाहच्या आदेशावरुन अल्लाहासाठी बलिदान देण्यासाठी जात होते. मात्र अल्लाहने हजरत इस्माइलला जीवनदान दिले. त्याच त्याग आणि बलिदानाच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. रमजान हा मुस्लीम बांधवांचा पवित्र महिना आहे. तो संपल्यानंतर सुमारे 70  दिवसांनंतर बकरी ईद साजरी केली जाते. या दिवशी कुर्बानीला विशेष महत्त्व असतं. जगभरात बकरी ईदचा हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. 
मुस्लिम बांधवांचा पवित्र बकरी ईद पाच दिवसावर आला आहे मात्र कोरोनाची पार्श्वभूमी आणि लॉकडाउन असल्याने  मुस्लिम बांधवांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बकरी ईद अत्यंत साधेपनाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. बकरीईद हे वर्षातील मोठा सण आहे. मुस्लिम धर्मात या सणास विशेष मान्यता आहे. यादीवशी कुरबानी दिली जाते. व गरीबांना अन्नदान केले जाते.  पण यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गाची भिती सर्वांनसाठीच  भीतीदायक ठरत आहे.  शनिवारी (ता. एक) ऑगस्ट रोजी बकरी ईद संपन्न होणार आहे. या संकटावर मात करण्यासाठी उमरगा येथील जमात कमीटीने सावधगीरीने पाऊले उचलुन मुस्लिम बांधवांना शासनाच्या नियमाचे पालन, सॅनिटाईझर, मास्क वापरणे याच्यासह ईद साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन प्रत्येक मस्जिदच्या स्पिकरद्वारे करण्यात येत आहे. यावेळी मुस्लिम जमात कमिटीचे अध्यक्ष बाबा औटी, याकुब लदाफ, अलिम बिजापुरे, कलिम पठाण, मुफ्ती ईब्राहीम, अय्युब मौलाना, निजाम व्हताळे,खालीद शेख, शमिम सास्तुरे, मदनशा मुर्शाद, आदी उपस्थित होते. 


 
Top