Views

वाढत्या संसर्गामुळे कळंब शहरात राहणारी इतके दिवस जनता कर्फ्यू

‌कळंब:-(प्रतिनिधी)
शहरात मागील काही दिवसापासून कोरोनाचा प्रभाव वाढत आहे त्यामुळे अधिक संसर्ग होऊ नये म्हणून कळंब प्रशासनाने ३ऑगस्टपासून (सोमवार) 9 ऑगस्ट म्हणजेच 7दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे अशी माहिती कळंब नगरीचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी दिली जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे उद्या म्हणजे शनिवारी जनता कर्फ्यू असेल रविवारी खरेदीसाठी मार्केट नेहमीप्रमाणे खुले राहतील मात्र सोमवारपासून 7दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे जनता कर्फ्यू दरम्यान दवाखाने ,मेडिकल, दूध ,पाणी आणि बँक याच्या व्यतिरिक्त इतर आस्थापना बंद रहातील यादरम्यान किराणा पेट्रोल सुद्धा मिळणार नाही तर दूध आणि पाण्याचे जार सकाळी1O वाजेपासून सुरू राहतील तर दवाखाने आणि मेडिकल 24 तास सुरू राहतील कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपालिका प्रशासन आणि नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व शहरातील काही व्यापारी बैठक पार पडल कळंब नगरीचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांनी या कल्पनेला विरोध केला याने काही साध्य होणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली मात्र इतरांच्या एकमताने या जनता करण्याचा निर्णय घेण्यात आला


 
Top