Views


नेमके आपण काय काम केले ?..
न.प. च्या कामावर उपविभागीय आधिकारी आहिल्या गाठाळ यांची नाराजी

कळंब:-(प्रतिनिधी)

    कोविड विळखा वाढत असताना सुध्दा शहरात या बाबत काही दक्षता पाळण्यात येत नसल्यामुळे नगर पालिका प्रशासनाने कडक पाऊल उचलुन दंडात्मक कारवाई करावी अशी उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ  सूचना यांनी  देवून ...,....नेमके आपण आज पर्यंत काय काम केले या वर प्रश्न चिन्ह उभे करून नाराजी व्यक्त केली. 
     कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. त्यामुळे प्रशासन हादरले आहे. कळंब शहरालगच्या डिकसळ गावात कोरोनाचा रुग्ण सापडलेला असताना सुद्धा कळंब शहरात गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. या संदर्भात उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ यांच्या अध्यक्षतेखाली नगर पालिका प्रशासन व नगरसेवक यांची बैठक नगर पालिका सभागृहात आयोजित करण्यात आली होती.    
     नगर पालिका प्रशासनाने कोरोना संदर्भात काय उपाययोजना केल्या आहेत. याचा आढावा घेण्यात आला,न .प. वेवेगळे पथक तयार करून दंडात्मक कार्यवाही करावी, व नियमाचे पालन करण्या साठी शिस्त लावावी. लवकरच अँटी जन टेस्ट होणार असून या साठी नागरिकांना प्रवृत करावे, या साठी नगर सेवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन करून,कडक् पावले उचलावीत या साठी न.प. प्रशासनाचे कान ही टोचून नाराजी व्यक्त केली.
       यावेळी उपविभागीय अधिकारी आहिल्या गाठाळ यांनी नगर पालिका प्रशासनाने कोरोना संदर्भात जनजागृती करावी, सोशल डिस्टन्स पाळावा, व्यापाऱ्यांनी दुकानात सॅनिटायझर ठेवावे, दुकानामध्ये गर्दी करु नये, जास्तीत जास्त लोकांना मास्क वापरण्यास सुचना करावी, फळ विक्रेत्यांना सोशल डिस्टन्स पाळण्याची सुचना करावी, अशी सुचना उपविभागीय अधिकारी गाठाळ यांनी दिल्या आहेत.
यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष सुवर्णा सागर मुंडे, उपनगराध्यक्ष गिता महेश पुरी, मुख्याधिकारी देविदास जाधव होते. 
गटनेता शिवाजी कापसे, गटनेते श्रीधर भवर, मुख्याधिकारी देविदास जाधव, नगरसेवक लक्ष्मण कापसे, सतीश टोणगे, सुभाष पवार, नगरसेविका इंदुमती हौसलमल, सुरेखा पारेख, सफुरा काझी, आश्विनी शिंदे, कार्यालयीन अधीक्षक दिपक हारकर, स्वच्छता निरीक्षक संजय हाजगुडे, आदी या बैठकीस उपस्थित होते.
 
Top