Views
विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांच्या हस्ते कावलदरा, भक्त निवास तुळजापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले.

 महाराष्ट्र शासनाच्या वतीने वृक्ष लागवड, पंधरवडा साजरा करण्यात आला. 1587 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

 उस्मानाबाद जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाच्या वतीने वृक्षलागवड पंधरवडा साजरा करण्यात आला. एकूण 1587 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने 01 जुलै 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत उस्मानाबाद जिल्ह्यात वृक्ष लागवड पंधरवडा साजरा करण्यात येत असून दिनांक 01 जुलै 2020 रोजी मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या संकल्पनेतून उस्मानाबाद ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्ग वरील रस्त्याच्या दुतर्फा बाजूने झाडांचे वृक्षारोपण करून वनमहोत्सव साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले होते. 
त्यानुसार उस्मानाबाद ते तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा बाजूने दिनांक 01 जुलै 2020 रोजी महसूल विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्रधिकरण यांचे संयुक्त विद्यमाने 1587 रोपांचे  वृक्षारोपण करून वनमहोत्सव साजरा करण्यात आला. तसेच उस्मानाबाद ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग च्या डाव्या बाजूला 391 व उजव्या बाजूला 887 असे एकूण 1278 वडांची झाड तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कावलदरा येथील जागेत 309 असे एकूण  1587 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. 
    या प्रसंगी तहसीलदार कार्यालय उस्मानाबाद, तहसील कार्यालय तुळजापूर, उपविभागीय अधिकारी कार्यालय उस्मानाबाद, जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद, उस्मानाबाद तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सोलापूर आयआरबी कंपनी यांचे एकूण 350 अधिकारी-कर्मचारी सदर कार्यक्रमास उपस्थित होते.
     सदर कार्यक्रमास मा. विभागीय आयुक्त श्री सुनील केंद्रेकर सर, मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी विभागीय अधिकारी, तहसीलदार उस्मानाबाद, तहसीलदार तुळजापूर, विभागीय वन अधिकारी गायकर साहेब, सहाय्यक वनसंरक्षक बेडके साहेब, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे साहेब, व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम साहेब या प्रसंगी उपस्थित होते.
 तसेच मा. विभागीय आयुक्त श्री केंद्रेकर साहेब यांच्या हस्ते कावलदरा भक्त निवास तुळजापूर येथे वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी केंद्रेकर साहेब यांनी कुष्ठधाम नदीत श्रमदानातून मागील वर्षी लावण्यात आलेल्या ठिकाणी तसेच त्यात परिसरात लावण्यात आलेल्या मियावाकी धनवंत परिसराला परिसराला भेट दिली.


 
Top