Views
रोटरी क्लब  तर्फे भव्य रक्तदान व कोरोना वारियर्स सन्मान प्रदान

कळंब :- (प्रतिनिधी)

रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी तर्फे आज  रोटरी नूतन वर्ष व डॉक्टर्स डे निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्या मध्ये कोरोनामय वातावरणातही जवळपास 31 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्तदात्याना क्लब च्या वतीने 95 मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड वॉश, चे वितरण करण्यात आले.
डॉक्टर्स डे निमित्ताने कोरोना आजाऱ्याच्या काळामध्ये  ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर्स , नर्स व कळंब तालुक्यातील डॉक्टर्स यांनी केलेल्या अमूल्य कामगिरी बद्दल क्लब च्या वतीने  कोरोना वारियर्स हा सन्मान देऊन गौरीविण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  शिवसेना तालुका अध्यक्ष शिवाजी  कापसे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी चे असिस्टंट गव्हर्नर  मेघराज बरबडे हे होते. प्रमुख  पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय आधिक्षक डॉ. जीवन वायदंडे, शिवाजी कॉलेजचे प्राचार्य पंडित शिंदे, आयएएम चे अध्यक्ष डॉ. कमलाकर गायकवाड,केटिएमपीटी चे अध्यक्ष डॉ. अभिजित जाधवर , रोटरी चे  अध्यक्ष डॉ. गिरीष कुलकर्णी, सचिव डॉ . सचिन पवार,  हर्षद अंबुरे , हनुमंत चौधरी हे उपस्थित होते.
 या कार्यक्रमामध्ये रोटरी ने या वर्षी सुरू केलेल्या कोरोना रुग्णांसाठी आयुष काढा व कळंब शहरातील नागरिकांसाठी आर्सेनिक अल्बम या रोगप्रतिकारक शक्ती वर्धक औषधीचे  वितरण या उपक्रमाचे कौतुक करून रोटरीच्या समाजउपयोगी  कामाचेही कौतुक केले.
 या कार्यक्रमामध्ये कळंब शहरातील  शेतकरी,सीए, एसबीआय बँके चे शाखाधिकारी यांचे ही अभिनंदन करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कळंब शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर  उपस्थित होते . 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे प्रो.चेअरमन डॉ . रमेश जाधवर व सर्व रोटरी सदस्य यांनी परिश्रम घेतले.

 
Top