Viewsआरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे यांना
कोविड योध्याला विविध सामाजिक संस्थानी पुरस्काराने गौरविले*

अमरावती:-(प्रतिनिधी)

     जिल्ह्यातील मोर्शी येथील
स्थानिक उपजिल्हा रुग्णालय मोर्शी येथील आरोग्य कर्मचारी श्री.विनय शेलुरे यांनी सध्याच्या परिस्थितीत व लॉकडाऊन काळात 22 मार्चपासून ते आतापर्यंत मोर्शी शहरात बाहेर गावावरून आलेल्या लोकांना होम क्वारंटाईन तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करणे त्यांच्यात कोरोनाबद्दल जागृती निर्माण करणे गृहभेटीद्वारे जनजागृती करणे त्यांच्या आरोग्य विषयक समस्या जाणून घेणे कोरोनाच्या महामारीत स्वतः रक्तदान करणे व इतरांनाही प्रोत्साहन देऊन रक्तदान करून घेणे विनय शेलुरेच्या या कार्याची दखल डॉ.अनिल बोडें (अध्यक्ष किसान मोर्चा तथा माजी कृषिमंत्री) तसेच मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.विजय कळसकर यांनी घेऊन त्यांचा सत्कार केला 
     कोविड योद्धा म्हणून कोरोनाच्या संकटकाळात काम केल्याची त्यांच्या कार्याची दखल विविध फाऊंडेशन व सामाजिक संस्थानी घेतली व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे त्यामध्ये दि वर्ल्ड लारजेस्ट इंटरनॅशनल ह्यूमन ऑर्गनायझेशन,भारतीय मानवाधिकार परिषद,ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक व क्लिनिकल हेल्थ सायन्स,नॅशनल अँटी क्राइम आणि ह्यूमन राइट कौन्सिल ऑफ इंडिया, ग्लोबल इंटरनॅशनल,मदर तेरेसा फाऊंडेशन,अभिनेते विवेक ओबेरॉय यांचा मानवाधिकार सुरक्षा संघ दिल्ली महाराष्ट्र राज्य,भारतीय मौलिक अधिकारी संरक्षण ट्रस्ट,भारतीय मानवाधिकार असोसिएशन,रयत सामाजिक प्रतिष्ठान,पोलीस फ्रेंड्स वेल्फेअर असोसिएशन,सम्यक मैत्रेय फाऊंडेशन,सरपंच सेवा संघ,निरवन फाऊंडेशन,एकता फाऊंडेशन,जनविकास सेवाभावी संस्था,भारतीय महिला अत्याचार विरोधी मोर्चा,चंद्रशेखर कृषी व ग्रामविकास प्रतिष्ठान,शिक्षण मित्र ग्रामीण कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ,छावा स्वराज्य सेना महाराष्ट्र राज्य,अखिल भारतीय सुवर्णकार समाज मंडळ,डिझायर फाउंडेशन,साई सत्यम प्रतिष्ठान,राज्य युवा परिषद महाराष्ट्र या सर्व संस्थांनी गौरविले आहे
          विनय शेलुरे यांच्या कार्याबद्दल उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन कोरडे,डॉ.विवेक साबळे,डॉ.शेख ओसामा,डॉ.निंभोरकर, डॉ.भूषण खेरडे आरोग्य सहायक विनायक नेवारे आरोग्य कर्मचारी रितेश कुकडे,अमोल राजस,मनिष अग्रवाल, सुनील तांबडे,सतीश माहुरे, सुजित वानखडे,डी एम आरलवाड,प्रशांत बेहरे,राहुल भोसले, राधाकिसन वैद्य,तुषार पोहकार,श्रीजीत दाभेकर,प्रवीण गेडाम,रोहित सरवान,आरोग्य दूत कमर अली यांनी अभिनंदन व कौतुक केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या........ 
Top