Views


वाशी तालुक्यातील पारगाव सर्कल मधील जनकापूर येथील पिक विमा भरणा दोन दिवसांत सुरू करा अन्यथा कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा 

उस्मानाबाद:(सैफोदिन काझी) 

वाशी तालुक्यातील पारगाव सर्कल मधील जनकापूर या गावातील शेतकरी पिक विमा भरणे पासून वंचित राहत आहेत.यापूर्वी हरभरा ज्वारी गहू आदी पिकांचा विमा या गावातील शेतकऱ्यांना भरता आला नाही. मागील वर्षी या गावातील शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान होऊनही त्यांना त्याचा कसलाही मोबदला भेटलेला नाही. यावर्षी पिक विमा कंपनीकडून काय करता गावाचा पिक विमा भरून घेतला जात नाही. पिक विमा भरताना ऑनलाइन पोर्टलवर जनकापूर या गावातील खाते नंबर किंवा सर्वे नंबर टाकला तर जवळका येथील शेतकऱ्याचे नाव दिसत आहे. त्यामुळे जनकापूर येथील शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहत आहेत.
    त्यामुळे वरिष्ठांनी याची दखल घेऊन दोन दिवसाच्या आत जनकापूर येथील शेतकऱ्यांचा पिक विमा भरण्याची सोय करावी.अन्यथा दि.16/7/2020 रोजी तालुका कृषि कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल.व याची सर्वस्वी जबाबदारी विमा भरून घेणारी कंपनी तसेच कंपनीचे कर्मचारी व कृषी विभागाचे अधिकारी व प्रशासनाचे अधिकारी राहतील.अशा प्रकारचे लेखी निवेदन तालुका कृषी अधिकारी श्री कोयले यांना शिवसेना वाशी उपतालुकाप्रमुख विकास तळेकर यांनी दिली आहे.

 
Top