Views


कळंब येथील उपजिल्हा  रुग्णालयात  विविध सुख सोयी उपलब्ध करून द्या....


उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)
 येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध मागण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले.
  आरोग्यमंत्री राजेश टोपे उस्मानाबाद जिल्हा दौऱ्यावर आले असता कळंब येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटणीस तारेख मिर्झा व प्रदेश कार्यकारीणी सदस्य शंतनु खंदारे यांच्या वतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन सादर करण्यात आले.
    निवेदना मध्ये  उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याची मागणी करण्यात आली, तसेच महिलांसाठी स्वातंत्र्य 30 बेडचे रुग्णालय मंजुर करण्यात यावे, तसेच वाढत्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता नजीक कुठेच सोयी सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कळंब उपजिल्हा रुग्णालयात 20 बेड चे ट्रामा केअर सेन्टर मंजूर करण्यात यावे ,   येथील कोविड सेन्टर ला आवश्यक असणारे N95 मास्क व PPE किट उपलब्ध करून घ्यावे .
 उपजिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेल्या जागेचा नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करून  इमारत उभी करण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेबांनी तत्काळ दखल घेऊन आपल्या सर्व मागण्या त्वरित पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले.
 
Top