Views


इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे कोविड योद्धा पुरस्कारा ने सन्मानित 

कळंब :-(प्रतिनिधी)

कोरोना संकटाच्या काळात कळबं तालूका मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार  विलास मुळीक  यांनी जीवाची परवा न करता सोशल मिडीयाच्या माध्यमातून व वृत्तपत्रच्या बातम्याच्या माध्यमातून जे कोरोना बद्धल समाजासाठी जनजागृतीसाठी  योगदान दिले, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना  आय. एम. ए. तर्फे डॉक्टर्स डे चे औचित्य साधून कोव्हिड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १जुलै हा दिवस भारतरत्न डॉ. बी सी रॉय यांच्या स्मरणार्थ संपूर्ण देशभर डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो.याच दिवशी उपजिल्हा रुग्णालयात हा कोव्हीड योद्वा हा सन्मान पत्र इंडियन मेडिकल असोशिएशन चे प्रदेशअध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोढे,वैद्यकिय आधिक्षक डॉ. जीवन वायदंडे,डॉ. सत्यप्रेम वारे, शाखाध्यक्ष डॉ. कमलाकर गायकवाड यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला.

 
Top