Views


भूम तालुक्यात पहिलेच नागपूरच्या धम्म दिक्षा भूमीचे  गिरलगाव येथे बौध्द विहार बांधले जात आहे .

भूम : - (आसिफ जमादार) 
    तालुक्यात पहिलेच नागपूरच्या धम्म दिक्षा भूमीचे  गिरलगाव येथे बौध्द विहार बांधले जात आहे . 
    या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे . या कामाच्या पूर्णत्वासाठी बौद्ध बांधवांनी योगदान दयावे असे आवाहन बौद्धाचार्य गोकुळ गायकवाड यांनी केले आहे .
  गुरुवार दिं २३ जुलैं रोजी गिरलगाव ता भूम येथे नागपूरच्या धम्म दिक्षा भूमिच्या धर्तीवर लोकसहभागातून धम्म गिरी बुध्द विहार स्तूप (घुमट) बांध काम शुभारंभ करण्यात आला. यामुळे ध्यान साधना , धम्म वर्ग , बाल संस्कार शिबीर घेण्यासाठीची आडचण दूर झाली आहे . गावागावात समाज मंदिर आहेत परंतु बौद्ध विहारची कमतरता होती.
  यावेळी महेंद्र घायतडक ,तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा जामखेड रमेश सदाफुले मा.ता. अध्यक्ष सुरेखा सदाफुले. शहर अध्यक्ष अनिल सदाफुले शाहीर बाबा राजगुरू , समाजरत्न रवींद्र लोमटे, संदीप शिंदे, पो. पा.मिलिंद वाघमारे , पै.बिभीषण वाघमोडे शिल्पकार, ह.भ. प.आरणे महाराज ,गोकुळ गायकवाड ,यांच्या सह समाज बाधंवगावकरी तसेच बौद्धाचार्य : गोकुळ गायकवाड, गोवर्धन गायकवाड,आप्पा गायकवाड, सुभाष गायकवाड ,सतिश गायकवाड, बाजीराव गायकवाड ,वसंत गायकवाड, विनोद सोनवणे, सुनिल गायकवाड उपस्थित होते.
 
Top