लोहारा शहरातील नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयाची यशाची परंपरा कायम
लोहारा:-(इकबाल मुल्ला)
भारतीय राष्ट्रीय शिक्षण संस्था संचलित नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा यांनी आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. महाविद्यालयातील 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 92. 63 % इतका लागला आहे.वाणिज्य शाखेचा निकाल 84.05 % इतका लागला आहे.तर कला शाखेचा निकाल 70.00 % लागला आहे. तर कनिष्ठ महाविद्यालयाचा एकत्रित निकाल 80.26 % लागला आहे. महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे आहेत -- वाणिज्य शाखा :- 1) प्रथम क्रमांक कु. गोरे निकिता नानासाहेब 82.15 %, 2) द्वितीय क्रमांक कु. कडबाने मनीषा व्यंकट 76.30 % 3) तृतीय क्रमांक कु. पालकर प्रगती श्याम 75.23 %, कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे:- 1) प्रथम क्रमांक कांबळे शिवम सतीश 79.84 %, 2) द्वितीय क्रमांक चव्हाण पृथ्वीराज भागवत 77.23 %, 3) तृतीय क्रमांक शेख इमरान मेहबूब 72.61 %, विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी पुढील प्रमाणे :- 1) प्रथम क्रमांक कु. मुळे स्वराजंली प्रकाश 74.00 %, 2) द्वितीय क्रमांक कु.काडगावे रोहिणी राम 73.08 %, 3) तृतीय क्रमांक कु. चिद्रे अकांशा किशोर 72.62 %, वरील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे सचिव डॉ.शेषेराव शंकरराव जावळे पाटिल सर, प्राचार्या श्रीमती यु.व्ही.पाटील, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.