Views



हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर या संस्थेच्यावतीने सामाजिक भावना जपत कोरोनाबाबत लोहारा तालुक्यात जागृती करून 33 गावातील निराधार, वृद्ध, गरजू, एकट्या , आजारी, अदि गरजुवंत गरीब नागरिकांना किराणा साहित्य वाटप केले

लोहारा:-(इकबाल मुल्ला)

हॅलो मेडिकल फाउंडेशन अणदूर ही संस्था 1993 च्या भूकंपा पासून लोहारा तालुक्यातील गावात महिला व बालकाचे आरोग्य, महिला सक्षमीकरण, बचत गट, स्वावलंबन, आरोग्य शिक्षण, स्त्री पुरुष समानता, महिलांचे हक्क, अधिकार  एकल विधवा, परिक्तत्या, यांना रेशन, पेन्शन, रोजगार, बाबत प्रशिक्षण, तसेच निर्धार समानतेचा प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांवरील होणारी कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा यासाठी संस्था युवक गट, व किशोरी गटा सोबत 15 गावात काम करीत आहे. या भागात पावसाअभावी दर तीन वर्षाला पडणार दुष्काळ व नैसर्गीक आपत्ती वेळी जनावरांना पिण्याचा पाण्याचे हौद, एकल महिलांना मदत, वाडी वस्ती ठिकाणी पिण्याच्या पाण्याची दोन हजार लिटरच्या टाक्या देण्यात आल्या, त्याचाच एक भाग म्हणून 2020 च्या कोविड -- 19 मध्ये लोहारा तालुक्यातील 33 गावात कोरोना बाबत काळजी घेण्या बाबत स्पीकरच्या माध्यमातून व माहिती पत्रक वाटून मोठ्याप्रमाणात जण जागृती केली. कोरोनामुळे पुणे, मुंबई हुन आलेल्या विस्थापिताची माहिती घेणें, स्विस एड पुणे यांचा आर्थिक सहकार्यातून लॉक डाऊन मुळे उपासमार होत असलेल्या  330 लघुउद्योग (हॉटेल, न्हावी) , भिक्षुक, पुजारी, गरजू वृद्ध, नागरिकांना, दोन महिण्याचे किराणा साहित्य किट, हँड वॉश, मास्क, व कोरोना बाबत माहिती पत्रक, घरपोच  देण्यात आली. या 33 गावातील निराधार, वृद्ध, गरजू, एकट्या, आजारी नागरिकांना दोन वेळेस जेवणाची व्यवस्था, 150 नागरिकांची करण्यात आली. तसेच लॉक डाऊन मुळे आर्थिक अडचणीत असलेल्या एकल विधवा महिलांना एक एकर ची पूर्व मशागत, पेरणी  खर्च व सोयाबीन बियाणे 90 महिलांना वाटप करण्यात आले. या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने संस्थेचे सर्वस्तरातुन अभिनंदन करण्यात येत आहे.



 
Top