Views


तलाठी अर्चना कदमला 25 हजाराची लाच स्विकारताना रंगेहात पकडले


उस्मानाबाद:- (प्रतिनिधी) - 
प्लॉटची ऑनलाईन सातबारा नोंद घेण्यासाठी शहराच्या महिला तलाठी अर्चना श्रीमंत कदम यांनी संबंधीताकडून 25 हजाराची लाच घेतली. लाच स्विकारताना श्रीमती कदम यांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने गुरुवारी (दि.23) उस्मानाबाद तलाठी कार्यालयात रंगेहाथ पकडले. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने एका पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांना त्यांचे व त्यांच्या आजोबांच्या प्लॉटची ऑनलाईन सातबारा नोंद घेण्यासाठी शहर तलाठी अर्चना कदम यांनी 34 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार याने गुरुवारी (दि.23) लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांचेकडे तक्रार केली. चौकशी अंती 34 ऐवजी 25 हजार रुपयाची लाच घेण्याचे तलाठी महिला श्रीमती कदम यांनी मान्य केले. गुरुवारी (दि.23) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला तलाठी अर्चना कदम हिस उस्मानाबाद तलाठी कार्यालयात 25 हजाराची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. श्रीमती कदम विरुध्द आनंदनगर पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरु आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांचे नेतृत्वात पोलीस कर्मचारी रविंद्र कठारे, मधुकर जाधव, विष्णु बेळे, समाधान पवार, महेश शिंदे, अर्जुन मारकड, श्री कांबळे यांनी केली.
 
Top