परंडा तालुका शिवसेनेतर्फे व्यंकय्या नायडू यांचा निषेधाचे निवेदन....
उस्मानाबाद:-(सैफोदिन काझी)
राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेत जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी या खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या उच्याराला आक्षेप घेतल्याच्या निषेधार्थ परंडा तालुका शिवसेनेच्या वतीने येथील तहसील कार्यालयात नायब तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध केला आहे दिनांक २३ रोजी राज्यसभेत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपली शपथ संपल्यानंतर जय महाराष्ट्र जय भवानी जय शिवाजी असा छत्रपती शिवाजी महाराज व जन्मभूमी महाराष्ट्र विषयी आदरयुक्त उल्लेख केल्याने यास राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी हे माझे चेंबर असून याठिकाणी अशा पद्धतीचे स्लोगन उच्यारणे योग्य नाही.
असे बोलून आक्षेप घेतल्याने सर्वत्र महाराष्ट्रभर याचा निषेध होत असून छत्रपती शिवरायांचा उल्लेख करणे हे राज्यसभेत चालत नसेल तर हा शिवरायांचा अपमान आहे. ही भावना समस्त शिवप्रेमी शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली असून भारतीय जनता पार्टीला छत्रपती शिवरायांबद्दल किती आकस आहे हे यावरून दिसून येत आहे व्यंकय्या नायडू यांनी याबाबत त्वरित माफी मागून राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव,उपतालुका प्रमुख शुक्रार्चय ढोरे,अनिल देशमुख,शाम मोरे,सतिश मेहेर ,अशोक गरड,अमोल जगताप,शशिंकांत खुने,नवनाथ बुरुंगे,बापु हावळे,भारत ढोरे,अदी उपस्थित होते.