Views
तेर येथील कै.रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराण वस्तूसंग्रहालयाच्या 15.68 कोटीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे.या कमाची गुणवत्ता पहाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली.

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

          उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील कै.रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराण वस्तूसंग्रहालयाच्या १५.६८ कोटीच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. कामाची गुणवत्ता पाहणी करण्यासाठी बांधकाम ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली.
   उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर गावाचे नांव निघाले की, जिल्हा तसेच देश विदेशातील पर्यटक, इतिहास प्रेमी भाविकांच्या डोळ्यासमोर वारकरी संप्रदायातील थोर संत संतश्रेष्ठ गोरोबा काका यांची प्रतिमा उभी राहते. तसेच विविध प्रकारचे विविध धर्माचे ऐतिहासिक मंदिरे, टेकड्या डोळ्यासमोर येतात. महाराष्ट्र शासन पुरातत्व व वस्तू संग्रहालय विभागाच्या वतीने येथील बैरागी टेकडी व कोट परिसरात माहे जानेवारी २०१५ पासून उत्खनन करण्यात येत आहे. यामध्ये सातवाहन कालीन अवशेष व वस्तू सापडत आहेत. यात काचेचे मनी, मातीचे मनी, शंखापासून बनविलेल्या बांगड्या, मनी, काजळ लावण्याचे आयन, हस्तिदंतापासून बनविलेली केस विंचरण्याची फणी, तांब्याची नाणी, मातीपासून बनविलेल्या विविध प्रकारचे मुखवटे, सातवाहन कालीन नक्षिकाम केलेली मातीची भांडी, ज्वारी, गहू, राळे, तूरडाळ, पाणी साठवण्याचे रांजण, लोखंडी धातूचे अवशेष, लाकडी तटबंदी, विटा अशा विविध प्रकारचे हजारो अवशेष सापडले आहेत.
      कै.रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराणवस्तू संग्रहालयात हा ऐतिहासिक वस्तूंचा ठेवा जतन करून ठेवण्यात आला आहे. परंतु पर्यटनाला अधिक चालना मिळावी, ऐतिहासिक ठेवा अधिक चांगल्या पद्धतीने जतन करता यावा. तसेच उत्खनात सापडलेल्या नवीन वस्तू ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने वस्तूसंग्रहालयाची नवीन इमारत उभी करण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सतत पाठपुरावा सुरू होता. दि.२०/०५/२०१७ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये निधी देण्याची मागणी केली होती.
     विधीमंडळात देखील आ.पाटील यांनी  तारांकीत प्रश्न तसेच औचित्याचा मुद्दा म्हणून हा विषय उपस्थित केला होता. त्यावर सरकारने सकारात्मक प्रतिसाद  दिला होता. परंतु याला गती मिळत नाही म्हणून ऑक्टोबर २०१६ च्या मंत्रिमंडळ बैठकीच्यावेळी देखील मंत्री सांस्कृतिक कार्य व मा.मुख्यमंत्री यांच्याकडे आ.पाटील यांनी  मागणी केली होती. तसेच दि. १० मार्च २०१७ रोजी मा.ना.विनोद तावडे, तत्कालीन सांस्कृतिक कार्य मंत्री यांना पत्राद्वारे मागणी केली होती.
     सततच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र शासनाने दि. ०७ ऑक्टोबर २०१७ च्या शासन निर्णयानुसार तेर येथील कै.रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराण वस्तूसंग्रहालयाच्या नवीन इमारत बांधण्यासाठी रु.१५.६८ कोटीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली. मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे जागतिक दर्जाचे वस्तूसंग्रहालय उभे करण्याचा आ.राणाजगजितसिंह पाटील यांचा मानस होता तो पूर्णत्वाकडे जाण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल आहे.
जागतिक दर्जाचे अत्याधुनिक वस्तूसंग्रहालय झाल्यामुळे तेर पर्यटनाच्या जागतिक नकाशावरील महत्वाचे ठिकाण गणले जाईल. या भव्य वास्तूमुळे हा ऐतिहासिक ठेवा जपण्यास मदत मिळणारच आहे. सोबत पर्यटकांचा ओघ वाढून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होवून परिसरातील आर्थिक उलाढाल वाढण्यास देखील मदत मिळणार आहे.
दरम्यान कै.रामलिंगअप्पा लामतुरे शासकीय पुराण वस्तूसंग्रहालयाच्या 15.68 कोटीच्या नवीन इमारतीचे बांधकाम कमाची गुणवत्ता पहाणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. 24 जून रोजी बांधकाम ठिकाणी प्रत्यक्ष पहाणी करून संबंधीतांना योग्य त्या सुचना दिल्या.

 
Top