Views


शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट,शेतकरी हवालदिल

उस्मानाबाद तालुका प्रतिनिधी:-(आसिफ मुलाणी)

उस्मानाबाद तालुक्यातील कारी पंचक्रोशीतील भागात पेरणी योग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांने सोयाबीन, उडीद,मूग, तूरपेरणी केली परंतु सोयाबीन बियानें उगवून न आल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे
शेतकऱ्याने पैशाची जुळवाजुळव करून मोठ्या किंमतीचे खते, बियाणे खरेदी केले होते परंतु ते न उगवल्यानें शेतकऱ्याला दुसऱ्यांदा पेरणी करावी लागत आहे आठवडाभराचा कालावधी संपला तरीही सोयाबीन न उगवल्यानें शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे
   तालुक्यातील अन्य गावातील शेतकऱ्यांनी ही सोयाबीन उगवले नसल्याचे सांगितले लॉक डाउन मुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलेले असताना अशा परिस्थितीत असं होतअसेल तर संबंधित कंपन्यांवर त्वरीत गुन्हे दाखल करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी तसेच दुबार पेरणीसाठी शासनाने शेतकऱ्यांना अनुदान द्यावे. असे जनहित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी सांगितले.
 
Top