Views


कृषीमंत्री मा. दादाजी भुसे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कृषी विभागाची आढावा बैठक 

उस्मानाबाद तालुका प्रतिनिधी:-(आसिफ मुलाणी)


जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे कृषी विभागाची जिल्हा स्तरिय आढावा बैठक मा.ना.श्री दादाजी भुसे साहेब कृषीमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार(दि.२२) रोजी संपन्न झाली. या बैठकीस प्रमुख्याने उपस्थिती राज्य कृषीमंत्री श्री दादासाहेब भुसे उस्मानाबाद जिल्ह्यादोऱ्यावर आले असता ते बोलत होते.ते म्हणाले साधारणतः दोन दिवसांपासून शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत शेतकऱ्याने सोयाबीन पेरल्यापासुन चार दिवसात त्याची उगवण अपेक्षित आहे सात-आठ दिवस झाल्यानंतर ही सोयाबीन उगवत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर शेतकरी बांधवांच्या तक्रारी आल्या आहेत बियाणे भोगस असतील तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करू शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही.सदरील बैठकीत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खते, बी-बियाणे व पिक कर्जाबाबत अडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे याबाबत जिल्ह्यातील शासन यंत्रणेस यादृष्टीने कार्यवाहीचे मंत्री मोहोदय यांनी निर्देश दिले.
      यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर ,जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे,आ कैलास घाडगे-पाटील, नगराध्यक्ष नंदू भैय्या राजेनिंबाळकर, विभागीय कृषी सहसंचालक श्री.डी.एन जगताप, जिल्हा कृषी अधीक्षक प्रभारी श्री. बजरंग मंगरुळकर, जिल्हा परिषद कृषी अधिकारी श्री.चिमनशेट्टी, कृषी सभापती दत्ता आण्णा साळुंखे, आत्माचे प्रकल्प अधिकारी आदीं कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थिती होती.
 
Top