Views


लॉक डाऊन नंतर अडीच महिन्यानी खामसवाडीतील जरबेरा फुले हैद्राबाद बाजारात .


कळंब:-(प्रतिनिधी)

लॉक डाऊन नंतर अडीच महिन्यानी खामसवाडी तील जरबेरा फुले गेली हैद्राबाद बाजारात गेली आहेत.
       कोरोनामुळे लॉक डाऊन मुळे अडीच महिने ठप्प झालेली जरबेरा विक्री प्रारंभ झाली आहे .खामसवाडीतील शेतकर्याची जरबेरा फुलाची पहिली खेप हैद्राबाद बाजारात गेली.
१४ मार्च पासुन कोरोना संसर्ग आटोक्यात आणणेसाठी लॉक डाऊन झाल्यामुळे  शेतकऱ्याच्या शेती उत्पादनातील जरबेरा फुलशेतीचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. आता लॉक डाऊनचे नियम शितील झालेमुळे बाजार सुरु झाले आहेत अडीच महिन्यानंतर सोमवार रोजी जरबेरा फुले पॅकींग हैद्राबाद मार्केटला गेल्याचे शेतकरी शंकर गरड यांनी सांगितले. 
खामसवाडी येथे सोळा शेतकऱ्यां कडे दहा गुंठ्यापासुन वीस गुंठे क्षेत्रावर जरबेराची पॉली हाऊस आहेत यंदा ऐन जरबेराचा फुल हंगाम तेजीत येताच कोरोनामुळे आलेल्या लॉक डाऊनमुळे दोन लाखापासुन दहा लाख रूपया पर्यंत नुकसान झाल्याचे शेतकरी शंकर गरड म्हणाले . मार्च ते जुन महिन्यात लग्न सराईत जरबेरा फुलाली मोठी मागणी असते मागणी वाढल्यामुळे दहा ते पंधरा रुपया पर्यत एका फुलाला किंमत मिळते पंरतु ऐन भाववाढीवेळी लॉक डाऊन आले मुळे जरबेरा उत्पादकाचे कंबरडे मोडले कांही शेतकऱ्यांनी लाखो रुपयाची फुले तोडुन टाकली कांही नी त्याचे खत केले तर कांही जणानी जरबेरा फुलाचे प्लॉट काढुन टाकले .लॉक डाऊन नंतर बाजार सुरु झालेमुळे शेतकरी पुन्हा नव्याने जरबेरा फुले बाजारात पाठवण्यास सज्ज झाला आहे.

चौकट

 खामसवाडी लॉक डाऊन नंतर  बाजारात पाठविण्यास तयार केलेली फुले बाहेर जात आहेत. त्या मुळे समाधान वाटत आहे.

श्रीकांत झोरी
खामसवाडी ता.कळंब जि.उस्मानाबाद

 
Top