Views


कळंब तालुका व्यापारी महासंघाचे विवीध मागण्याचे निवेदण
   
कळंब :-(प्रतिनिधी)

तालुका व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांच्या विविध मागण्याचे निवेदण मा.उपविभागिय अधिकारी साहेब यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री साहेब यांना देण्यात आले. 
     या निवेदना मध्ये  विविध मागण्या मांडण्यात आल्या.जिल्ह्यातील व्यापाऱ्याचे प्रतिष्ठाणे स्थानीक स्वराज्य संस्थेच्या जागेत आहेत. त्यांचे एक वर्षाचे भाडे माफ करावे.लॉक डाऊन काळातील विज बील माफ करावे.लॉक डाऊन काळात व्यवसाय बंद असल्यामुळे बॅकेचे व्याज माफ करावे.सर्व व्यापाऱ्यांचा व्यवसाय कर माफ करावा.जी.एसटी आदा करण्याची मुदत सहा महीन्यानी वाढवावी.केंद्र सरकारने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष करास सहा महीणे मुदत वाढ दयावी.आशा प्रकारच्या मागण्या मांडण्यात आल्या. 
        यावेळी तालुका महासंघाचे अध्यक्ष श्री नंदकिशोर मोरे, सचिव बालाजी बावळे, उपअध्यक्ष प्रताप शिंदे शहर अध्यक्ष मयुर रुणवाल,किशोर गोरे, गणेश लाखे, सतीश भांडे व इतर व्यापारी हजर होते.

 
Top