Views


सलून दुकाने सुरू करण्याची मागणी करत  आंदोलन करण्याचा इशार नाभिक संघटनेने दिला

कळंब:-(प्रतिनिधी)

महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सलून दुकाने सुरू करण्यात यावीत, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तहसीलदार मंजुषा लटपटे यांच्या मार्फत  देण्यात आले.
      निवेदनात म्हटले आहे की, सलुन दुकाणे सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, किंवा नाभिक समाजाला आर्थिक मदत करावी.  मागील 70 ते 80 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रात राज्यातील सलुन दुकाणे बंद आहेत, त्यामुळे नाभिक समाजावर उपासमारीची वेळ आली आहे, वेळोवेळी निवेदने देऊन शासन दरबारी नाभिक समाजाने आपल्या व्यथा मांडल्या आहेत, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही,  संपूर्ण महाराष्ट्रातभर . श्री. कल्याण दळे साहेब अध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ यांच्या नेतृत्वाखाली ,  संपुर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाची दखल  घ्यावी व सलुन व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात यावी, किंवा सलुन व्ययसायास दहा हजार रुपये तातडीची मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनाची आपण दखल घेतली नाही तर यापुढे उपाशी मरण्यापेक्षा आणखी आंदोलन तीव्र करू व यामध्ये होणार्‍या सर्व परिणामाची जबाबदारी शासनाची असेल असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर प्रेमचंद गोरे, जिल्हा संघटक, तालुकाप्रमुख बापुराव सुरवसे, उपाध्यक्ष सचिन मंडाळे, शहराध्यक्ष युवराज पंडित,  युवक तालुकाअध्यक्ष राजे सावंत,   कर्मचारी तालुका अध्यक्ष सतीश गोरे, जिल्हा उपाध्यक्ष कल्याण मंडाळे,  विष्णु मंडाळे, ज्ञानेश्वर पंडित, गोकुळ मंडाळे, मुन्ना काळे, प्रवीण गाडे, अशोक मंडाळे, योगेश करवलकर, ज्ञानेश्वर मंडाळे, लिंबराज देवकर,  महेश काळे,  आदी उपस्थित होते.                      , लॉकडाउन सुरू झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातील नाभिक समाजाची सलुन दुकाणे बंद आहेत, त्यामुळे नाभिक समाजाची उपासमार होत आहे,   वेळोवेळी शासनाला आमच्या व्यथा शासनासमोर मांडल्या आहेत, तरी याची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे आम्हाला  शासनाने दुकाने सुरू करण्याची परवानगी द्यावी किंवा आर्थिक मदत करावी.  जिल्हा संघटक प्रेमचंद गोरे.
 
Top