महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ आयोजित रक्तदान शिबिरात 102 रक्तदात्यांचे रक्तदान
उस्मानाबाद:-(प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ भूमच्या वतीने भूम येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबीरा मध्ये 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले याबाबत सविस्तर सविस्तर वृत्त असे की जगामध्ये कोरोणाचे थैमान सुरू असून त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्यावतीने आयोजित शिबिरात 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन राज्य संघाचे अध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, प्रभारी नायब तहसीलदार प्रमोद सावंत , सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे , गटशिक्षणाधिकारी सुरेश नाना वाळके यांची प्रमुख उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिरासाठी राज्य संघाचे चिटणीस भक्तराज दिवाने, जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, जिल्हा कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल माने, उपस्थित होते. परंडा तालुक्याचे तालुकाध्यक्ष शिवाजी शिंदे, अरुण पाटील, दैवान पाटील, रवी कापसे, शाहिर नवले, वाशी तालुक्यातील रंजीत कवडे, प्रदीप म्हेत्रे, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राज्य संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ टकले, विभागीय कार्याध्यक्ष अर्जुन गुंजाळ, जिल्हा कार्याध्यक्ष श्रीनिवास गलांडे, यांचे मार्गदर्शनाखाली तालुका संघाचे अध्यक्ष रामेश्वर शिंदे, महिला आघाडीच्या अध्यक्ष चंदा तांबारे, संजीवन तांबे, हरिभाऊ साळूंके, अंगद मिसाळ, पी एल बोराडे, वैजिनाथ नरके ,रणजीत पाटील, किशोर बुरंगे ,परशुराम थाटे, सुनिल गुंजाळ, धैर्यशील नरके, वनिता कोकाटे, वर्षा पाटील , लक्षमी इंगळे, वंदना इंगळे, जयश्री मुळे, बालाजी गुंजाळ, या सर्वांनी सहकार्य केले.