Views


उस्मानाबाद जिल्हा मध्ये आणखी सात नवीन कोरोणा रूग्ण आढळले  

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी)

उस्मानाबाद जिल्ह्यातील सात जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे तर  शनिवार(दि. २०).रोजी सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 30 swab तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले आहेत, त्यापैकी ७ पाॅझिटिव्ह ,१ inconclusive व २२ नेगेटिव्ह असा आहे.

* पाॅझिटिव्ह पेशंट ची माहिती.*

२ पेशंट बोळेगावं ता. तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पाॅझिटिव्ह पेशंटच्या संपर्कातील आहेत व ५ पेशंट नळदुर्ग ता तुळजापूर येथील असून पूर्वीच्या पाॅझिटिव्ह  पेशंटच्या संपर्कातील आहेत.

एकुण रुग्ण- १७५
बरे झालेले रुग्ण- १३१
मयत- ०६
उपचार सुरू रूग्ण-३८

 
Top