Views


*शहारातील बाबा नगर , ईस्लामपुरा भागातील खानखा मस्जिद समोर एका महिलेवर तलवारी ने जिवघेणे हल्ला

*हल्लेखोर  कपडे बदलून फरार होण्याच्या मार्गावर असतांनाच कळंब पोलिसांनी काही तासातच आरोपी ला  ताब्यात घेतले.


कळंब:-(प्रतिनिधी)
  
    शहारातील बाबा नगर , ईस्लामपुरा भागातील खानखा मस्जिद समोर एका महिलेवर  शनिवार (दि.२०) रोजी संध्याकाळी सात साडेसात वाजण्याच्या सुमारास प्रदीप खेपकर नावाच्या व्यक्तीने तलवारी ने जिवघेणे हल्ला करून पळून गेला होता. या हल्ल्यात सदर ची महिला गंभीर जखमी झाल्याने त्या उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. महिलेच्या डोक्यावर, पोटावर आणि हातावर गंभीर जखमा झाल्या आहेत.
    हल्लेखोर कळंब बायपास रोड वरून कपडे बदलून फरार होण्याच्या मार्गावर असतांनाच कळंब पोलिसांनी काही तासातच आरोपी ला अटक करून ताब्यात घेतले. आरोपी हा सदर महिलेस मागितल ५ -६ वर्षांपासून त्रास देत होता. काल " तु मला का बोलत नाहीस ?" असे म्हणून महिलेवर तलवारी ने जिवघेणे हल्ला केला.अशी माहिती सदर महिलेने पोलिसांना दिली. महिलेच्या जवाबावरून आरोपी वर कळंब पोलिस ठाण्यात कलम ३०७,५०६,५०४ भा.द.वी सह ४,२४ भा.ह.का प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 
Top