Views

कळंबच्या तहसिलदार मंजूषा लटपटे काठी घेउन उतरल्या कन्टेंमेंन्ट झोन मध्ये


कळंब :-(प्रतिनिधी)

तालुक्यातील कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी  महिला तहसीलदार आपल्या स्वत:च परिवारासारखी संपूर्ण तालुक्याची कळजी घेत मंजूषा लटपटे यांनी तालुक्यातील गावोगावी फिरूण कोरोना ला हारवण्यासाठी जनजागृती केली आहे.त्याच बरोबर रेडझोन असलेल्या तालुक्यातील शिराढोण गावात स्वत: च हातात काठी घेवून कर्तव्य बजावत असलेल्या महिला अधिकारी  लटपटे यांचे कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र कौतूक होत आहे.उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यात कोरोना ग्रस्तांचा आकडा झपाटयाने वाढत असुन तालुक्यातील प्रशासन झटकून कामाला लागले आहे.या संगळया प्रशासकीय नियोजनामध्ये कळंबच्या महिला तहसिलदार मंजूषा लटपटे यांचे तालुक्याची आई असल्या सारखे मोलाचे योगदान आहे.कोरोनाच्या पार्श्वभुमीवर   सुरूवातीपासुनच योग्य नियोजन आणि केंद्र आणि राज्य सरकारचे नियम जनते पर्यंत पोहचवून त्याचे कडेकोट पालन कसे होईल याची दक्षता घेत लटपटे हे काम करत आहेत .त्याच बरोबर तालुका वैदयकीय प्रशासन ही आपले कर्तव्य पनाला लावत तालुका कोरोना मुक्त करण्यासाठी काम करत आहे.कोरोनाच्या रूग्णांबरोबरच बाहेर गावातून तालुक्यात येणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून त्यांना क्वरंटाईन करणे सरकारची वेळोवेळी आलेली नियमावली त्याचे पालन करूण तालुक्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेवून लॉकडाउनचा कालावधी यशस्वीरित्या पार पाढण्यात तालुका प्रशासनास यश आले आहे.पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांना ताबडतोब उपचार करूण त्याची चौकशी आणि रूग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांना ताबडतोब क्वरंटाईन करूण कोरोना विषाणूंचा संसर्ग वाढणारा धोका थांबवण्याचे काम तालुका प्रशासनाने आगदी खबरदारीने केल्याचे दिसते.या संगळया कामामध्ये तालुका प्रशासनाची महत्वाची भुमीका राहीलेली आहे.   

 
Top