Views


शिवसेनेच्या वतीने अर्सेनिक अल्बम 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.


उस्मानाबाद : (सैफोदिन काझी) 

कोरोना विषाणूंचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अद्याप यावर कोणतेही औषध उपलब्ध नाही . या विषाणूं पासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे गरजेचे असल्याने आयुष मंत्रालयाने होमिओपॅथी चे अर्सेनिक अल्बम- ३० ही औषधी उपयोगी असल्याचे जाहीर केले आहे.
वाशी शहरासह ग्रामीण भागांमध्ये  शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे यांच्या वतीने मदत नव्हे तर कर्तव्य या उद्देशाने आज 
रविवार दि.07 जून रोजी पाच हजार कुटुंबाना आयुष्य मंत्रालयाने शिफारस केलेल्या अर्सेनिक अल्बम- 30 या गोळ्यांचे वाटप करण्यात आले  .
वाशी नगर पंचायत हद्दी मध्ये तसेच केळेवाडी,कवडेवाडी,या सह वाड्या- वस्त्यांमध्ये अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या वाटप करण्यात आले.हे उपक्रम राबविण्यासाठी कार्यकर्त्यांची  टिम बनवन्यात आल्या होत्या , त्या संबंधीत सर्व सुचना त्यांना देण्यात आल्या दिलेल्या सुचनेनुसार. या गोळ्यांचे सेवन केव्हा व कसे करायचे , त्याचे प्रमाण तसेच त्याचे किती डोस घ्यावे लागतील ते कोणत्या पद्धतीने घ्यावे याची सर्व कल्पना देऊन अर्सेनिक अल्बम ३० गोळ्या वाटप करण्यात आल्या 
यावेळी शिवसेनेचे नेते प्रशांत चेडे, वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख, तहसीलदार संदिप राजापुरे,नगर पंचायत चे मुख्याधिकारी गिरीश पंडीत,
, नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी,माजी नगराध्यक्ष नितीन चेडे, मंकरंद शिंगनापुरे , विकास मोळवणे,किरण जगताप, बाळासाहेब सुकाळे, बाळासाहेब हजारे,सतीश शेरकर, शिवहार स्वामी, अजय विर, संतोष मोळवणे,   सुरज सुकाळे यांच्या सह आदि कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top