Views


सरकारी रुग्णालयात खाजगी डॉक्टरांचा हातभार

कळंब  :- (प्रतिनिधी)

येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटर हे आय टी आय हॉस्टेल मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. पेशंट ची वाढती संख्या विचारात घेता आणि पावसाळ्यातील साथरोगांचा वढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन येथील उपजिल्हा रुग्णालयात पूर्वी प्रमाणे रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार दि ८ जुन पासुन या सेवा सुरळीत चालू होणार असुन शासकीय डॉक्टर्स ची कमतरता लक्षात घेता येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जिवन वायदंडे यांचे आवाहनास प्रतिसाद देऊन कळंब शहरातील खासगी डॉक्टर्स हे सरकारी दवाखान्यात मोफत सेवा  देणार आहेत.
वैद्यकीय अधिक्षक डॉ जिवन वायदंडे यांचे अध्यतेखाली खाजगी डॉक्टर्स ची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी आय एम ए चे प्रदेशाध्यक्ष डॉ रामकृष्ण लोंढे, शाखाध्यक्ष डॉ कमलाकर गायकवाड, सचिव डॉ सत्यप्रेम वारे, डॉ रमेश जाधवर, डॉ अभिजीत जाधवर, डॉ रमेश वाघ, डॉ थळकरी, डॉ गिरीश कुलकर्णी, डॉ सचिन पवार, डॉ आडमुठे, डॉ गोरे, डॉ अभय मनगिरे,श्री व सौ डॉ कुंकुलोळ, श्री व सौ डॉ ढेंगळे, डॉ देशमुख, डॉ कल्याणकर, डॉ भवर, आदी उपस्थित होते.

 
Top