Views

कळंब मध्ये ३३ मावळ्याचे रक्त दान 

कळंब :-(प्रतीनीधी)

 संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने मागील सात दिवसापासून  महाराष्ट्रभर रक्तदान सप्ताह शिबिराचे  आयोजन करण्यात आलेले होते, याला ठीकठिकाणी प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. 
शिवराज्याभिषेक दिनानिमित्त चालू असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या रक्तदान सप्ताहात रक्तदान शिबिर दि.६ जून रोर्जी कळंब शहरात  घेण्यात आले, त्यामध्ये 33 रक्तदात्यांनी आपले रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. सध्या जगभरात  कोरोनाने थैमान घातले आहे, त्यामुळं रक्ताचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे, महारष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला साथ संभाजी ब्रिगेडच्या वतीने संजीवनी क्लिनिक कळंब येथे रक्तदान शिबीर घेण्यात आले, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला, यावेळी  मराठा सेवा संघाचे  जिल्हाध्यक्ष प्रकाश धस,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अतुल गायकवाड,डॉ.दिगग्ज दाबके,डॉ.रमेश वाघ,संदीप शेंडगे,दत्ता कवडे,सुशील हुंबे,विकास गडकर, राहुल चोंदे,दत्ता पवार, कथले युवक आघाडी चे बाळासाहेब कथले,यश सुराणा, उपस्थित होते, नारी शक्ती विचार मंच ज्योती सपाटे यांच्या वतीने मास्क वाटप रक्तदान शिबीर पार पाडण्यासाठी अक्षय मुळीक, स्वप्नील बरकसे यांनी परिश्रम घेतले. 
Top