Views

भंगार गोडाऊनला आग सात लाखाचे नुकसान


 कळंब:-(प्रतीनीधी)

शहरातील मार्केट यार्ड मधील भंगार (रद्दी)  गोडाऊनला अचानक २ जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून या आगीमध्ये जवळपास ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे याबाबत अधिक वृत्त असे की कळंब शहरातील मार्केट यार्ड शेख सरफराज नाशेर  यांच्या मालकीचे रद्दी गोडाऊन आहे. या गोडाउन मध्ये वजन काटा स्क्रॅप साहित्य, रद्दी, प्लास्टिक साहित्य, स्टील भांडी, पत्रे ट्यूब टायर इत्यादी वस्तू होत्या या गोडाऊनला दोन जून च्या मध्यरात्री अचानक आग लागून आतील सर्व साहित्य जळून खाक झाले या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही लॉक डाऊन काळामधील संपूर्ण माल याच गोडाऊनमध्ये असल्याने मोठे नुकसान झाले आहे याबाबत पोलिसांनी पंचनामा केला असून या बाबत कळंब पोस्टेला अकसमत जळीताची  नोंद करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास पोलिस नाईक जे. एस. माने हे करत आहेत.

 
Top