Views
माजी पालकमंत्री  मंत्री तथा भूम-परंडा-वाशीचे आमदार तानाजी सावंत यांनी वाशी तहसील कार्यालयात  घेतली  आढावा बैठक

उस्मानाबाद:-(सैफोदीन काझी )

 वाशी येथे सर्व विभागीय प्रशासकीय अधिकार्‍यांसह आढावा बैठक घेतली.जलसंधारण मंत्री तथा विद्यमान आमदार तानाजी सावंत यांनी आज वाशी तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांची ची आढावा बैठक घेतली.यावेळी या बैठकीमध्ये तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून वाशी तालुक्यातील सोयाबीन न उगवलेल्या शेतकऱ्यांचा आढावा घेतला.तसेच ज्या शेतकऱ्यांचे सोयाबीन उगवले नाही यांच्या शेताचे तात्काळ पंचनामे करून दुबार पेरणीसाठी त्यांना बियाणे उपलब्ध करून देण्याचे आदेश आमदार तानाजी सावंत यांनी कृषी अधिकाऱ्याला दिले. तसेच पंचनामा करून दुबार पेरणी साठी बियाणे तात्काळ उपलब्ध झाले नाही. आणि या कारणामुळे जर एखाद्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली तर यासाठी जबाबदार कोण,अशा शब्दात आमदार तानाजी सावंत यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. यावेळी कोरोना आजार संदर्भातही तालुक्‍यासह जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला या आढावा बैठकीला वाशी चे तहसीलदार संदीप राजपुरे  यांच्यासह सर्व विभागाचे प्रतिनिधी उपस्थीत होते. 
  तालुक्यातील कोणत्याही गावातील शेतकऱ्याला कोणत्याही बँकेने पीक कर्ज देणे बंधनकारक आमदार तानाजी सावंत.        पीक कर्ज संदर्भात काही शेतकऱ्यांनी आमदार तानाजी सावंत यांच्याकडे बँकेतील आडमुठ्या धोरनाची भूमिका मांडली. यावेळी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना पूर्वी ज्या बँका पिककर्ज देत होत्या त्या बँकेतून इतर बँकांमध्ये जाण्याचे आदेश संबंधित बँकेचे शाखा अधिकारी  देत आहेत अशा प्रकारची माहिती उपस्थित शेतकऱ्यांनी आमदार तानाजी सावंत यांना दिली.यावेळी आमदार सावंत यांनी तात्काळ सर्व बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांना तालुक्यातील कोणताही शेतकरी कोणत्याही बँकेमध्ये आला तरीही त्याला पीक कर्ज देणे हे तुम्हाला बंधनकारक आहे अशा कडक शब्दांमध्ये सूचना दिल्या, त्याचबरोबर येत्या 15 जुलैपर्यंत पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे का नाही ते मी पंधरा तारखेला येऊन पाहणार अशाही कडक सूचना आमदार सावंत यांनी सर्व बँकांच्या शाखा अधिकाऱ्यांना दिल्या.
   या बैठकीला शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष धनंजय सावंत,कृषी सभापती दत्ता साळुंखे,प्रशांत चेडे, जिल्हाप्रमुख गौतम लटके,जिल्हा परिषद सदस्य उद्धव साळवी,तालुकाप्रमुख ॲड सत्यावन गपाट, शिवहार स्वामी,  सतीश शेरकर ,उपतालुकाप्रमुख विकास तळेकर ,बाळासाहेब मांगले, युवासेना उपतालुका प्रमुख स्वप्नील कोकाटे,सरपंच दिनकर शिंदे, अतुल चौधरी,नितीन रणदिवे, बंडू खोसे तानाजी कोकाटे, प्रवीण गायकवाड आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top