Views


कळंब येथे शिवराज्याभिषेक दिन साजरा

कळंब:-(प्रतिनिधी)

सध्या महाराष्ट्रात कोरोना या रोगाने हाहाकार माजवला आहे.याच पार्श्वभूमीवर आज शनिवारी शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात आला. त्यासाठी निवडक कार्यकर्ते रायगडला रवाना झाले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रायगडावर न येता घरातच शिवराज्याभिषेक दिन साजरा करावा, असे आवाहन खासदार संभाजीराजे  छत्रपती यांनी केले होते.

याच विनंतीला मान देत आज कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे भगवा ध्वज चढवुन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साधेपणाने साजरा करण्यात आला.यावेळी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

यावेळी कळंबच्या नगराध्यक्षा सौ सुवर्णा मुंडे,उपनगराध्यक्ष संजय मुंदडा,श्रीधर भवर,नगरसेवक शिवाजी कापसे,अमर गायकवाड, भाजप चे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजित पिंगळे,संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्षअतुल गायकवाड, भाजप तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,स्व.गणपतराव कथले आघाडीचे यश सुराणा,भैया बावीकर,शिवाजी गिड्डे,माणिकराव बोंदर,संताजी वीर आदी च्या वतीने पुष्पहार व भगवा ध्वज फडकवून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला.

 
Top