Views


*पारगाव सशस्त्र दरोडेखोरांचा धुमाकूळ मारहाणीत तिघे जखमी

*दरोडेखोरांनी गावातील वेगवेगळ्या चार घरांना लक्ष्य बनविले

वाशी :-(प्रतिनिधी)

    तालुक्यातील पारगाव येथे संपूर्ण गाव गाढ झोपेत असताना सशस्त्र दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत हे जखमी झाले असून त्यांच्यावर बीड येथे उपचार चालू आहेत हे घटना रविवारी पहाटे घडली या घटनेमुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरण आहे
दरोडेखोरांनी गावातील वेगवेगळ्या चार घरांना लक्ष बनवले यात अण्णा मनोहर दोघे भुसार मालाचे व्यापारी अरुण दगडू मोठे व त्यांच्या पत्नी कालींदा अरुण मोठे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झाले अण्णा डोके यांच्यावर बीड येथील ग्रामीण रुग्णालयात तर अरुण मोठे व त्यांची पत्नी यांच्यावर बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत
याचवेळी पारगाव चे माजी सरपंच महादेव आखाडे यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता मात्र कुटुंब जागी असल्याने चोरटे पळून गेले दरम्यान मेहबूब पठाण यांच्या घरात जाऊन दरोडे यांनी गल्ला तोडण्याचा प्रयत्न केला यादरम्यान शेजारच्या काही लोकांच्या घराच्या कड्या लावून हा मारहाणीचा प्रकार घडल्याने पुरणात गावातील नागरिक भयभीत झाले आहेत व्यवसायिकांनी गाव बंद केले आहे

 
Top